Site icon

ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात होऊन निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप भोसले व नायब तहसीलदार मधुकर गवांदे यांनी निवडणुकीदरम्यान कामकाज पाहिले. पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती आणि बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे निकालावरून दिसून आले.

ग्रामपंचायतनिहाय 69 ग्रामपंचायतींचे सरपंच याप्रमाणे : आंबे मेघराज राऊत (राष्ट्रवादी), सुरगाणा नामदेव नेवाळ (अपक्ष), धोंडमाळ बायजाबाई शिंगाडे (अपक्ष), कोहोर शांताबाई चौधरी (शिवसेना), पाहुचीबारी रमेश चौरे (राष्ट्रवादी), करंजखेड कमलेश वाघमारे (अपक्ष), कळमबारी विष्णू मुरे (शिवसेना), माळेगाव दिलीप राऊत (राष्ट्रवादी), शिवशेत सुनंदा भडांगे (राष्ट्रवादी), कोपुर्ली बु. मीराबाई वाघेरे (राष्ट्रवादी), जोगमोडी हेमराज राऊत (राष्ट्रवादी), कापुर्णे उषा गवळी (अपक्ष), कोपुर्ली खु. मनीषा पालवी (राष्ट्रवादी), हातरुंडी शोभा सातपुते (अपक्ष), तिर्ढे सोमनाथ नाठे (राष्ट्रवादी), जुनोठी संदीप भोये (काँग्रेस), खिरकाडे कलावती भोये (अपक्ष), कायरे प्रभावती सातपुते (राष्ट्रवादी), दोनवाडे सुरेश जाधव (राष्ट्रवादी), जळे मनोहर चौधरी (अपक्ष), कुळवंडी सुनंदाबाई सहारे (काँग्रेस), उंबरदहाड जिजाबाई कुंभार (राष्ट्रवादी), बाडगी अशोक मुकणे (अपक्ष), लिंगवणे सोमनाथ पोटिंदे (अपक्ष), आड बुद्रुक घनश्याम महाले (अपक्ष), भायगाव शकुंतला चौधरी (राष्ट्रवादी), हनुमाननगर पद्माकर गायकवाड (अपक्ष), हनुमंतपाडा वृषाली गवळी (अपक्ष), जांभूळमाळ एकनाथ ढाडर (अपक्ष), एकदरे गुलबा सापटे (शिवसेना), उस्थळे चंद्रकला भुसारे (राष्ट्रवादी), शिंदे रोहिणी गवळी (राष्ट्रवादी), करंजाळी दुर्गनाथ गवळी (राष्ट्रवादी), गांगोडबारी मोहन गवळी (शिवसेना), देवगाव यादव राऊत (अपक्ष), सावळघाट मनोज भोये (राष्ट्रवादी), बोरवट पंकज पाटील (अपक्ष), उंबरपाडा अनिता गवळी (अपक्ष), कोटंबी किरण भुसारे (शिवसेना), मांगोणे हेमराज गवळी (अपक्ष), कुंभारबारी दीपाली भोये (राष्ट्रवादी), हरणगाव पल्लवी भरसट (अपक्ष), आसरबारी गीता जाधव (काँग्रेस), वांगणी मीरा फुकाणे (शिवसेना), जांबविहीर प्रवीण गवळी (राष्ट्रवादी), रानविहीर कौशल्या भुसारे (शिवसेना), खोकरतळे सविता भुसारे (शिवसेना), तोंडवळ नामदेव वाघेरे (शिवसेना), आडगाव भु. रेखा गावित (माकप), कहाडोळपाडा तुळशीराम भांगरे (अपक्ष), धानपाडा विठाबाई गालट (शिवसेना), भुवन विलास दरोडे (राष्ट्रवादी), माणकापूर भारती रिंजड (अपक्ष), उम्रद रतन पेटार (अपक्ष), पिंपळवटी राशी भांगरे (अपक्ष), गावंध धनराज ठाकरे (शिवसेना), देवीचामाळ नामदेव गावित (अपक्ष), शेवखंडी लीलाबाई चौधरी (राष्ट्रवादी), शिंगदरी तुळशीराम पागी (अपक्ष), चोळमुख कुसुम पेटार (राष्ट्रवादी), घनशेत शांता चौधरी (अपक्ष), पाटे रुक्मिणी गुंबाडे (शिवसेना), म्हसगण ऊर्मिला अलबाड (शिवसेना), कुंभाळे मोहन कामडी (शिवसेना), गोंदे संदीप माळगावे (राष्ट्रवादी), राजबारी श्याम गावित (शिवसेना), डोल्हारमाळ संगीता बठाले (राष्ट्रवादी), रुईपेठ विनायक भोये (शिवसेना), आमलोन वनिता भोये.

दोन उमेदवारांना समान मते…
मतमोजणीदरम्यान तालुक्यातील कोपुर्ली खु. येथील ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधील दोन महिला उमेदवार गीता जनार्दन गायकवाड व मीनाक्षी गणेश तलवारी यांना समान 186 मते मिळाल्याने लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी उचलून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. त्यात मीनाक्षी तलवारी या विजयी झाल्या.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Exit mobile version