ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध

कांचन घोडे www.pudhari.news
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
येथील बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच मोहनीश दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली. यावेळी नऊ सदस्यांपैकी पुष्पा धुर्जड, कांचन घोडे, सिंधुबाई पवार, आकाश पागेरे, सुरेखा पाळदे असे सहा सदस्य उपस्थित होते. तर उपसरपंच पदासाठी कांचन घोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोंदे यांनी घोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी सचिव म्हणून ग्रामसेवक लक्ष्मीकांत पटेल तर निरिक्षक म्हणून मंडल अधिकारी भाऊसाहेब काळे यांच्यासह अशोक कुटे, सोमनाथ कुटे, जयप्रकाश धुर्जड, राहुल धुर्जड, सचिन धुर्जड, चक्रधर धुर्जड, संकेत धुर्जड, सुनिल पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंचपदाची बिनविरोध निवड होताच गुलाल उधळून पेढे वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध appeared first on पुढारी.