ग्रामीण भागात नागरिकांची कोरोनाबाबत बेफिकीरी; तब्बल सात लाखांचा दंड वसूल

नाशिक : कोरोनाबाधितांचे वाढत प्रमाण लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जात आहे. ग्रामीण भागात पंधरा दिवसांमध्ये चार हजार १९९ नागरिकांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सात लाख तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

नाशिक शहरासह लगतच्या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात ग्रामीण भागात मास्क न वापरणे, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स न पाळणे आदींबाबत थेट कारवाई करण्यात आली. चार हजार १९९ नागिरकांकडून सात लाख तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस दल संयुक्तपणे मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी, तसेच बसमध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करीत आहेत. सर्वाधिक दंड इगतपुरी तालुक्यातून जमा झाला आहे. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

तालुकानिहाय दंड 
तालुका नागरिक दंडात्मक रक्कम 

देवळा २०४ ३३ हजार ८०० 
बागलाण ६०५ ७३ हजार ८८० 
सुरगाणा ००९ ९०० रुपये 
इगतपुरी ७५७ १ लाख ३६ हजार ६०० 
चांदवड ३०५ ५४ हजार ४०० 
दिंडोरी २०३ ३६ हजार 
मालेगाव ३६२ ६७ हजार ६०० 
निफाड ५१२ ९६ हजार ४०० 
नाशिक २६६ ३२ हजार ६५० 
सिन्नर ०४८ ८ हजार ६५० 
कळवण २०५ ३८ हजार ३५० 
पेठ ०८९ १७ हजार ३०० 
नांदगाव २३१ ३१ हजार ३०० 
त्र्यंबक १५९ ३० हजार ७०० 
येवला २२९ ४४ हजार ५००  

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता