ग्राहक फिरकत नसल्याने गोवऱ्या विक्रेत्यांमध्ये चलबिचल; होलिकोत्सवाचा बाजार थंड! पाहा VIDEO

पंचवटी (जि.नाशिक) : रविवारच्या (ता.२८) होलिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आदिवासी भागातून मोठ्या संख्येने गोवरी विक्रेते दाखल झाले आहेत. परंतु, मोठ्या होळ्यांबाबत प्रशासनाकडून अजूनही संभ्रमावस्था असल्याने ग्राहकच नाही, अशी परिस्थिती उद्‌भवली आहे. 

होलिकोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रेते दाखल 
होळी अन्‌ भारतीय समाजमनाचे आगळे व पारंपारिक नाते आहे. आदिवासी समाजापासून ते समाजातील उच्चभ्रू समाजात होळीबद्दल मोठे आकर्षण व उत्साह असतो. शहरातील विविध मंडळातर्फेही होळीचे आयोजन केले जाते, याशिवाय घरगुती होळ्याही मोठ्या प्रमाणावर पेटविल्या जातात. यासाठी सहाजिकच पेठ, सुरगाणा, हरसूल या आदिवासी भागातील लोक वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेल्या गोवऱ्या घेऊन शहरात दाखल होतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जपावबंदीचा आदेश दिल्याने सार्वजनिक होळ्या पेटतील की नाही, याबाबत शाशंकता आहे. त्यामुळेच गोवऱ्या खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याने विक्रेत्यांमध्ये चलबिलच आहे. 

हेही पाहा > महाराष्ट्र पोलिस अकादमीतील भावी फौजदार 'सैराट'! शासनाच्या नियमांची धज्जीया VIDEO VIRAL

पाचची गोवरी रूपयात 
होळीसाठी लागणाऱ्या थापलेल्या गोवरीला मोठी मागणी असते. त्यामुळे अनेक आदिवासी वर्षभर मेहनत घेऊन गोवऱ्या थापतात. याशिवाय रानशेणी गोवऱ्या गोळा करण्यासाठी थेट जंगलात किंवा दूरवर जावे लागते, तेव्हा पाटीभर गोवऱ्या हाताला लागतात, मात्र वर्षभर मेहनत घेऊन व त्यावर मोठा प्रवासखर्च करून शहरात आणलेल्या गोवऱ्यांना यंदा ग्राहकच नसल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत. कोरोनाचा फटका होळीलाही मोठा बसेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया एका आदिवासी विक्रेत्यांने व्यक्त केली असून ती पुरेशी बोलकी आहे. कारण या आदिवासींचे अर्थकारण अशा व्यवसायांवर चालते. कालपर्यंत पाच रूपयांत एक असलेल्या गोवरीचा दर आज दोन रूपयांवर तर काही ठिकाणी अवघ्या रूपयांवर येऊन पोहोचला होता. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

मोठ्या होळ्यांबाबत संभ्रमावस्था 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळाच्या होळ्या पेटण्याची शक्यता कमीच वाटते. त्यामुळे घराघरासमोर रंगणाऱ्या पाच गोवऱ्यांच्या होळ्या मोठ्या प्रमाणावर पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय यंदाच्या रंगपंचमीलाही प्रशासनाने नकार दिल्याने रहाडीची धूमची रंगणार नसल्याने तरूणाईचा हिरमोड झाला आहे.