पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहरासह ग्रामीण भागात घरफोडीसह चोरी करणाऱ्या चार संशयितांना निफाड तालुक्यातून सापळा रचून शिताफीने जेरबंद केले आहे. तसेच गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चारचाकी, चार दुचाकी, २० तोळे सोने-चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी ऊर्फ शिवा सदाशिव मालखेडे (२१), महेश सदाशिव मालखेडे (१९) दोघे रा.जऊळके फाटा, ता. दिंडोरी, संजय छोटू पहाडे (१९, रा. मोरे मळा, पंचवटी) व श्रावण पोपट भालेराव (२३, रा. जनार्दननगर, नांदूर नाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जऊळके फाटा व निफाड येथून या संशयितांना अटक झाली. पोलिस तपासात त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत दोन गावठी कट्टे बाळगणारा संशयित कृष्णा अनिल चव्हाण (२२, रा., एकलहरे झोपडपट्टी, पहाडी बाबा) पोलिसांनी शिताफीने अटक केली.
हेही वाचा
- Jalgaon News : तीन दिवसांपासून बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा आढळला मृतदेह
- Nashik Crime : गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त
The post घरफोडीसह चोरी करणाऱ्या चौघांना सापळा रचून अटक appeared first on पुढारी.