घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

नाशिक : गावातील एका घरात घुसून त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत घराबाहेर ओढत आणले. त्यावेळी कुटुंबियांनी विरोध करत मुलीला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला..त्यानंतर त्याने मुलीला कारमध्ये बसवून तो पळून गेला. काय घडले नेमके वाचा...

गावातील एका घरात तो घुसला अन् मग....

शनिवारी (ता.२९) ची घटना... दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावातील रायबा तानाजी संधान नावाचा व्यक्ती दुपारच्या दरम्यान गावातील एका घरात घुसला. त्याने अल्पवयीन मुलीचा हात धरत घराबाहेर ओढत आणले. त्यावेळी कुटुंबियांनी विरोध करत मुलीला रायबाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रायबा याने मुलीच्या आजोबांना मारहाण करत धमकी दिली. मुलीला त्याची कारमध्ये(एम.एच.४३-१३३२) मध्ये बसवून तो पळवून गेला.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावात सराईत गुन्हेगाराने घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करत अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.मुलीच्या नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन रायबा संधान याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच