घरात घुसून तेवीस गोण्या व पाच हजार रुपयांचा माल चोरला; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक रोड : पळसे येथे अज्ञात चोरट्याने शेतात असलेल्या घरामध्ये प्रवेश करून 40 हजार रुपये किमतीच्या 15 क्विंटल च्या भरलेल्या तेवीस गोण्या व पाच हजार रुपये किंमतीचे दोन नांगराचे फाळी असा सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा माल चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाळीस हजार किंमतीचा माल चोरी   
संतोष रुंजा गुंड राहणार पळसे यांच्यानाशिक सहकारी साखर कारखांना रोडवर असलेल्या पार्ले कंपनी जवळ शेतातील घरात अज्ञात चोरट्याने घुसून चाळीस हजार रुपये किमतीच्या 15 क्विंटलच्या भरलेल्या तेवीस गोण्या व पाच हजार रुपये किंमतीचे दोन नांगराचे फाळी असा सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा माल चोरुन नेला. याप्रकरणी गुंड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान