घाणेगावला अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा; लाखोंची मुद्देमाल जप्त

मालेगाव (जि. नाशिक) : घाणेगाव (ता. मालेगाव) शिवारात ३२ गुंठे क्षेत्रावर अफूची अवैधरित्या लागवड केल्याचे पोलिसांना आढळले. तालुका पोलिसांनी छापा टाकत ४७ लाख ५४ हजारांचे ९५० किलो वजनाचे अफूचे बोंडे पानांसह जप्त केले.

अफूची शेती करणारे रामेश्‍वर संसारे, गोकुळ संसारे व निंबा शिल्लक (तिघे रा. घाणेगाव शिवार) यांच्याविरुध्द तालुका पोलिसांत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात अफूचा अजून काही मुद्देमाल मिळून येण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. मालेगाव तालुक्यात अफूची शेती करण्याचा बहुधा हा पहिलाच प्रकार आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो उघडकीस आला. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ