घाबरू नका! चांदवडचे कोविड सेंटर सुरक्षित; फर्निचर दुकान मात्र जळून खाक

गणूर (जि. नाशिक) : चांदवड येथील मुंबई-आग्रा महामार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या खाजगी कोविड सेंटर बिल्डींगला आग लागल्याची घटना आज (ता. ६) रोजी घडली, आगीचे व धुराचे प्रचंड लोट असल्याने बेसमेंटला लागलेल्या फर्निचर दुकानाची आग वरील मजल्यावर असलेल्या कोविड सेंटरला देखील हानी पोहचवेल अशी भीती होती, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्यांनी वेळीच प्रयत्न केल्याने सदर आग  नियंत्रणात आली आहे. धुराचे लोट कमी होताच खाजगी कोविड सेंटर पूर्णतः सुरक्षित असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान आगीने भीषण स्वरूप धारण करण्यापूर्वीचं येथील सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना घाबरण्याचे कारण नाही. दुसरीकडे मात्र बेसमेंट ला असलेलं फर्निचर दुकान मात्र पूर्णतः जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून ही आग कशामुळे लागली याचीच सर्वत्र चर्चा आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी