घोटी, इगतपुरीकरांना हुडहुडी! तालुकाभरात जागोजागी पेटल्या शेकोट्या

इगतपुरी (जि. नाशिक) : शहरासह तालुक्यात उसळलेल्या शीत लहरीमुळे तापमानाचा पारा खाली घसरला आहे. नाशिक जिल्ह्याबरोबरच इगतपुरी तालुक्यात त्याचा चांगलाच प्रभाव जाणवत आहे.

चार-पाच दिवसांपासून थंडीचा प्रचंड कडाका वाढल्यामुळे घोटी, इगतपुरीकरांना हुडहुडी भरली आहे. यामुळे तालुकाभरात सकाळी आणि रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर, सर्वाधिक वर्दळीचा मुंबई- आग्रा महामार्ग सुद्धा सध्या मंदावला आहे. दरम्यान, उत्तरेकडील सर्वच राज्यांत शीत लहरी कायम आहेत. त्याचा परिणाम सध्या सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे काही भागात थंडीची लाट पसरली आहे.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

दैनंदिन व्यववहार मंदावला

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांत त्याचा मोठा प्रभाव पडत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. तालुक्यातील शेतीच्या कामकाजावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, गुलाबी थंडीची तीव्रता इगतपुरी परिसरात वाढत असल्याने सकाळी ऐवजी दुपारी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच पहाटे जॉगिंग व व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची वर्दळही कमी झाली आहे. शेकोटीचा आधार घेणे असे अनेक जण पसंत करत आहेत. थंडीमुळे माणसांचे सर्व दैनंदिन व्यवहार मंदावलेला आहे. मात्र, पशू,पक्षी आणि पाखरांचे मात्र हेच व्यवहार सुरळीत चालू आहेत. दारणा धरण परिसरात सकाळच्या सुमारास पाखरे मुक्तछंद होऊन शुध्द हवेचा आणि त्यापेक्षाही मुक्त व आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहेत. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच