घोटी खून प्रकरणातील दोघे फरार जेरबंद

घोटी: पुढारी वृत्तसेवा; ऐन दिवाळीत पाडव्याच्या मध्यरात्री युवकाचा खून करणाऱ्या दोन फरार भावांना घोटी पोलिसांनी कसोशीने तपास करत जेरबंद केले. शहरातील रामरावनगर येथील प्राथमिक शाळेसमोर प्रमोद गंगाराम शिंदे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. खुनानंतर कृष्णा विनायक बोराडे (२३) व वैभव विनायक बोराडे (२७) हे दोघे संशयित फरार झाले होते. घोटी पोलिसांनी शोध घेत त्यांना ४८ तासांत अटक केली. घोटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक अनिल धुमसे, सुदर्शन आवारी यांच्यासह पोलिस पथकाने गुन्ह्याच्या तपासकामी मोलाची कामगिरी बजावली.

हेही वाचा :

The post घोटी खून प्रकरणातील दोघे फरार जेरबंद appeared first on पुढारी.