जळगाव : जिल्ह्यातील यावल-फैजपूर रोड वरील डोंगरकठोरा फाट्याजवळ ओल्या चंदनाच्या लाकडांची तस्करी करतांना दोघांना अटक करण्यात आली. यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल ते फैजपूर रस्त्यावरील डोंगरकोठारा फाट्याजवळ दोन संशयित पोलिसांना दिसल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सुशील घुगे यांच्या पथकाने संशयितांची झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत 28 किलो तब्बल 89 हजार 600 रुपये किंमतीचे चंदनाचे ओलसर लाकूड मिळून आले.
संशयित ऋषिकेश बबन बेदरे (27, बेल्होरा, ता.बीड) व श्रावण गणपत पवार (नवगण राजुरी, जि. बीड) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात भारतीय वन अधिनियम कलम व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम लाकूड तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान करीत आहेत.
हेही वाचा :
- सांगली : ‘जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अन्यथा लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन’
- Pune News : पेयजल योजनेचं काम पाच वर्षांनंतरही अपूर्ण
The post चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.