
धुळे : पुढारी वृत्तसेवा
उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आज धुळे शहरात सर्व आंबेडकरी संघटनेसह सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद धुळे शहरात उमटले. राज्यामध्ये जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलेले आहे, तेव्हापासून राज्यपाल व सरकारमधील काही मंत्री हे महापुरुषांच्या बद्दल जाणून बुजून आक्षेपार्ह विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप करीत आहेत. या वाचाळवीरांना तातडीने समज द्या आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारने हकालपट्टी करा, अन्यथा आंबेडकरवादी संघटना, कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील. असा गंभीर इशारा देखील यावेळी देण्यात आला.
धुळे शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा आक्रोश मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा आग्रा रोड मार्गे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, शशिकांत वाघ, शिवसेनेचे महेश मिस्त्री, अतुल सोनवणे, हिलाल माळी, राष्ट्रवादीचे रणजीत भोसले, महेंद्र शिरसाठ, राज चव्हाण, शंकर खरात, बाबा हातेकर, अनिल दामोदर, योगेश ईशी, किरण जोंधळे, डॉ. शरद भामरे, किराणा गायकवाड, विशाल पगारे, किरण इशी, मुकेश खरात, आनंद सैंदाणे, भैया पारेराव, सिध्दार्थ वाघ, विवेक नेतकर, सुगत मोरे, बापू भामरे, लोटन वाघ, नाना नेरकर, विनोद केदार, बबलू खरात, सुंदर भोई, पुनम शिरसाठ, संघमित्रा बैसाने, कल्पना सामुद्रे, प्रा.भाग्यश्री बैसाने, ॲड. धनश्री बैसाने, सरोज कदम, नैना दामोदर, शारदा भामरे, वनिता गरुड, निर्मला शिंदे, बबीता मोरे, अक्षरा नांद्रे आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा :
- कामशेत : प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे ; पीएमपीएल बसचालकांचा हलगर्जीपणा
- लाचेचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावा पुरेसा : सुप्रीम कोर्ट (Prevention of Corruption Act)
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्याने समाजात दुफळी : उदयनराजे भोसले
The post चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी appeared first on पुढारी.