चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर

अपघात www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड शहरातील महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीनपैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगाव तालुक्यातील पांढरून येथील किरण सीताराम बेलखेडे, रवींद्र सीताराम बेलखेडे (२३) व रोशन सुदाम मोहनकर (१९) हे तिघे दुचाकीने (एमएच १५, जीक्यू ४६०८) मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे चालले होते. हे तिघे नाशिकच्या तवली फाटा येथील रहिवासी होत. चांदवडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या गोई पुलाजवळ चालक किरण बेलखेडेचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला जाऊन धडकली. पाठीमागच्या बाजूला बसलेला रवींद्र बेलखेडे हा महामार्गावर आदळून नंतर नाल्यात पडला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. तर किरण बेलखेडे, रोशन मोहनकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. किरण बेलखेडे याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post चांदवडच्या गोई पुलावर अपघात; नाशिकचा तरुण ठार, दोघे गंभीर appeared first on पुढारी.