चांदवडच्या ‘त्या’ घटनेप्रकरणी मुलाच्या काकाविरोधात गुन्हा दाखल

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- ट्रॅक्टरने शेत मशागत करताना रोटावेटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १७) मंगरूळमध्ये घडली. याप्रकरणी ‘त्या’ मुलाचे काका मलकितसिंग कुलदीपसिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमरजितसिंग कुलदीपसिंग बेदी (४०) यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

मंगरूळ येथील अमरजितसिंग बेदी, मुलगा परमवीरसिंग व भाऊ मलकितसिंग हे तिघे सोमवारी दुपारी शेत गट नंबर २९०/२/ब मध्ये मक्याची पेरणी करत होते. मलकितसिंग हे ट्रॅक्टरने शेतात रोटर मारत होते. तर अमरजितसिंग व मुलगा परमवीरसिंग (१३) हे दोघे शेतातील कचरा वेचत होते. त्याचवेळी मलकितसिंग हे ट्रॅक्टर मागे घेत असताना परमवीर रोटरमध्ये अडकला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चांदवड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून काकाविरोधात गुन्हा दाखल झाला. हवालदार मन्साराम बागूल अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा-