चांदवड येथे रोटावेटर खाली सापडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

चांदवड (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा वेटर चालवत असताना ट्रॅक्टरवर बसलेला तेरा वर्षीय चिमुकल्याचा तोल जाऊन तो रोटावेटर खाली चिरडला गेला. त्यास उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील मंगरूळ शिवारात सोमवारी (दि.१७) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मंगरूळ येथील शेत गट नंबर २९०/२ मध्ये मलकित सिंग हे ट्रॅक्टरने शेतात रोटा वेटर चालवत होते. यावेळी ट्रॅक्टरवर परमवीर सिंग हरमीत सिंग बेदी (१३) हा बसलेला होता. ट्रॅक्टर सुरू असताना परमवीरचा तोल गेल्याने तो पडल्याने चालत्या रोटावेटर खाली सापडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. परमवीरचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडला. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: