चाडेगाव शिवारात बिबट्यांचे दर्शन; नागरिक झाले भयभीत

चाडेगाव (जि. नाशिक) : सिन्नर फाटा, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी या परिसरात 2 बिबट्यांचे दर्शन घडले आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे. 

एकाच दिवशी दिसले तीन बिबटे. 

चाडेगाव शिवारात लोकांना तीन बिबट्यांनी एकदाच दर्शन दिल्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यातील एक बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले आता दोन बिबटे सैरावैरा फिरत असून नागरिकांना दर्शन देत आहे.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

एक अडकला, अन दोन बिबटे सैरावैरा पळत सुटले.  

भिकाजी मुरलीधर नागरे यांच्या घराशेजारी 3 बिबटे दिसले होते. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नागरे यांना फोन वर माहिती दिली. त्यानंतर गोकुळ नागरे यांनी हिंमत दाखवत भिकाजी नागरे यांच्या घराशेजारी गेले असता, बॅटरी चमकल्याने तीनही बिबट्यांनी धूम ठोकली. याठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला मात्र दोन बिबटे सध्या सैरावैरा पळत सुटले.

पिंजरा लावण्याची वनविभागाला मागणी

बिबटे नागरिकांना रात्रीच्या वेळी दर्शन देत असून वन विभागाने पिंजरा लावून हे बिबटे जेरबंद करावे अशी मागणी चाडेगाव सामनगाव जाखोरी शिंदे परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश