चालकाचा पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न; गाडीची झडती घेताच प्रकार उघड

नाशिक :  गुन्हे शाखा युनिट एकला गुप्त माहिती मिळाली होती. त्‍या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्‍या पथकाने म्‍हसरूळ शिवारातील सुयोजित गार्डन परिसरातून सापळा लावत काळ्या रंगाची वोल्‍स वॅगन कंपनीची पोलो कार अडविली, जेव्हा गाडीची तपासणी करण्यात आली तेव्हा सर्वांनाच धक्क बसला... वाचा नेमका प्रकार

चालकाचा पळ काढण्याचा प्रयत्‍न

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सोमवारी (ता. ३०) गुन्हे शाखा युनिट एकला या प्रकरणाशी निगडित गुप्त माहिती मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांच्‍या पथकाने सापळा लावत ओशन कॅफ नावाच्‍या हॉटेलसमोरून काळ्या रंगाची वोल्‍स वॅगन कंपनीची पोलो कार अडविली. मात्र समोर पोलिसांना बघताच कारचालकाने त्यांना चुकवत पळ काढण्याचा प्रयत्‍न केला. परंतु पोलिसांनी मज्‍जाव करत संशयित कारचालक गणेश प्रभाकर ढापसे यास अडवत झाडाझडती घेतली. यात त्‍याच्‍याकडे चॉपर आढळून आले.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

ठाण्यात गुन्‍हा दाखल

अधिक तपास करताना गाडीची तपासणी केली असताना डिक्कीतून धारदार गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्‍यारे आढळून आली. गुप्त माहितीद्वारे गुन्‍हे शाखा युनिट क्रमांक एकने केलेल्या या कारवाई संशयित गणेश प्रभारक ढापसे (रा. मखमलाबाद) यास अटक करताना  त्याच्या सोबतच चारचाकी व हत्‍यारे जप्त केली आहेत. यानंतर संशयित गणेश ढापसे यास अटक केली असून, हत्‍यारांसह संशयिताची कारदेखील पोलिसांनी ताब्‍यात घेतली असून, म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे.

  1. हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच