चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव

कांदा

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांचा नवीन कांदा अजूनही बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांनी जो माल साठवून ठेवलेला कांदा आहे तो बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. चाळीसगाव बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला 4600 रुपये भाव मिळाला. बाराशे क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीला आला होता अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी दिली.

गेल्या आठवड्यात शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारात दोन हजार रुपये भाव मिळाला असताना आज कांद्याचा भाव चार हजार सहाशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्याचे उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात नाही. शेतकऱ्यांनी जो साठवलेला कांदा आहे तो सध्या बाजारात विक्री करण्यासाठी आणला जात आहे. त्यामधील 70 टक्के माल हा खराब झालेला आहे. जो वाचलेला आहे तो माल शेतकरी बाजार समितीमध्ये विक्री करण्यास आणत आहे.

नवीन उत्पन्न बाजार मध्ये आलेले नाही. दुष्काळी परिस्थिती असल्याने लागवड अत्यल्प आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज 4600 रुपये कांद्याला भाव मिळालेला आहे मात्र बाजारात नवीन उत्पन्न आलेले नाही शेतकऱ्यांनी साठवलेला कांदाच बाजारात विक्री करण्यासाठी आणलेला आहे.

हेही वाचा :

The post चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव appeared first on पुढारी.