चिंताजनक! नाशिकमध्ये पुन्‍हा कोरोना रुग्‍णांत वाढ; जिल्ह्यात २९६ पॉझिटिव्‍ह

नाशिक : शहरासह ग्रामीण भागात नागरिकांचा निष्काळजीपणा व नियमावलीकडे केला जाणारा कानाडोळा भोवण्याची चिन्‍हे आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत वाढ झाली आहे. त्‍यातही नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत आहेत.

नाशिक शहरातील २१४

शुक्रवारी (ता. १२) जिल्ह्यात २९६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, यापैकी तब्‍बल २१४ बाधित नाशिक शहरातील आहेत. दोन बाधितांचा मृत्‍यू झाला असून, एक शहरातील, तर अन्‍य एक मृत नाशिक ग्रामीणमधील आहे. 
गुरुवारी (ता. ११) जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला होता. दिवसभरात २०६ बाधित आढळले होते. शुक्रवारी २९६ पॉझिटिव्‍ह आढळले. यापैकी नाशिक शहरातील २१४, नाशिक ग्रामीणमधील ६४, मालेगावचे नऊ व जिल्‍हाबाहेरील नऊ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या १८० असून, यापैकी नाशिक शहरातील १११, नाशिक ग्रामीणमधील ५४, मालेगावचे दहा, तर जिल्‍हाबाहेरील पाच रुग्‍ण आहेत. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ११४ ने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार २७५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

एक लाख १४ हजार ५०० रुग्णांची यशस्‍वीरीत्‍या मात

बाधितांप्रमाणेच संशयित रुग्‍णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८८५ रुग्‍ण दाखल झाले असून, यापैकी तब्‍बल ८६० रुग्‍ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २८३ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. 
दरम्‍यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख १७ हजार ८४३ वर पोचली असून, यापैकी एक लाख १४ हजार ५०० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ०६८ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.   

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 