चित्रा वाघ यांचा संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप; नाशिकमध्ये पत्रकार परिषद

नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. आज चित्रा वाघ नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला.

अनेक दावे चित्रा वाघ यांनी केले
'यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पुजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलले, त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पुजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पुजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का?, असा प्रश्न मी एसपींनी केला त्या वर त्यांनी सांगितलं की पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही,' असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना