चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

नरकोळ (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवणपद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू असून रोजच्या आहारात सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी बाजरीच्या भाकरीला पसंती असून गॅस पेक्षा चुलीवरच्या भाकरीला ग्रामीण भागात आजही पसंती दिली जात आहे, शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण लागले आहे.

ग्रामीण भागात आजही चुलीवरच्या भाकरीला पसंती

हिवाळा म्हटला की, बरेच जण उबदार व पौष्टिक आहाराचे सेवन करतात. काहीजण काजू, बदामला प्राधान्य देतात. परंतु ग्रामीण भागात इतक्या महागड्या खाद्याला, लोकांकडून पसंती दिली जाते. परंतु हिवाळ्यात ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग ऊब तयार व्हावी, यासाठी काही धान्याची निवड करतात. त्यामध्ये उडीद, बाजरी, ज्वारी आदी धान्याचा समावेश असतो. परंतु शेतकरीवर्गाला हिवाळ्यात ऊब देणारी भाकरी म्हणजे चुलीवरची खरपूस बाजरीची भाकर. बाजरीची भाकर ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महिला तीन दगडांची चूल अथवा मातीपासून तयार केलेली चूल यावर मोठा तवा ठेवून लाकडी परातीमध्ये बाजरीचे पीठ मिसळून गरम गरम बाजरीची भाकर तयार करतात. विशेष म्हणजे चुलीवरच्या भाकरीवर जो पापुद्रा येतो त़ो खाण्याची मजा काही वेगळाच आनंद देऊन जातो.

भविष्यात बाजरी मिळणे कठीण?

सध्या फक्त ग्रामीण भागातच चूल पाहायला मिळते. शहरी भागात मातीच्या चुलीची जागा गॅसने घेतल्यामुळे शहरातील महिला चुलीवरची भाकरी बनविणे तर सोडा; पण त्या खाणेसुद्धा पसंत करीत नाहीत. खेड्यात बाजरीच्या भाकरीला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. कारण थंडीत मोठ्या प्रमाणात ऊब बाजरीच्या भाकरीतून मिळत असल्याने बळीराजा या भाकरीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो. परंतु बाजरीची भाकर खाण्यामागचे विज्ञान समजल्यामुळे आता शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या गरम गरम बाजरीच्या भाकरीचे आकर्षण वाटू लागले आहे. शेतकऱ्यांकडून बाजरीचे पीक घेण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने भविष्यात बाजरी मिळणे कठीण होते की काय, असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

भाकरीबाबत अजून काही>>>

-बाजरी मध्ये मॅग्रोशियम व फाॅस्फरस सारखा पोषक घटक असतो 

बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते

बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते,

-बाजरीची भाकरी खाल्ल्या लवकर भूक लागत नाहीं

-हॉटेल धाब्यावर बाजरीच्या भाकरीबरोबर मटणाला चांगलीच पसंती मिळते,

-बाजरी ही उत्तम उर्जी स्ञोत आहे,बाजरीत गहू, तांदूळ यापेक्षा अधिक उर्जा आहे,

-प्रथिने जीवनसत्त्वे कॅल्शियम जीवनसत्त्व बी,6 अधिक आहे,

-एकेकाळी कोरडवाहू पिकामध्ये बाजरी होते होती,आता दिवसेंदिवस शेतीत आमुग्रह बदल होत असल्यामुळे बागायती क्षेत्रात विशेष उन्हाळी पीक म्हणून या पिकाकडे पहिले जाते परंतु गावरान बाजरी मिळणे दुरापास्त झाले आहे,

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

बाजरीच्या भाकरी बाबत सर्वांना अधिक उत्सुक या असते रोज पाच पकवान आहारात समावेश केला तरी भाकरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही इतके महत्त्व बाजरीच्या भाकरीला आहे,- तात्या काकडे केरसाणे