चेष्टामस्करीचा दुःखद शेवट! तरुणाला गमवावा लागला जीव

पेठ (जि. नाशिक) : एकाच गावातील दोन तरुणांमध्ये चेष्टामस्करी सुरू असताना चेष्टेचे रूपांतर वादात झाल्याने तरुणाला जीव गमवावा लागला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी (ता. २२) जांबविहीर येथील रहिवासी अरुण वाघमारे (वय २१) व हर्षद पवार (२०) दोघांमध्ये चेष्टामस्करी सुरू असताना चेष्टेचे रूपांतर किरकोळ वादात झाले. वाद झाल्याबाबत हर्षदने वडील भारत पवार यांना सांगितले. हर्षद व भारत पवार या पिता-पुत्रांनी अरुणला गावातील चौकात ग्रामस्थांसमोर ओढून आणत मारहाण केली. लोकांसमोर मारहाण झाल्याने अरुणला मनस्ताप झाला. परिणामी त्याने गावालगतच्या कांतिलाल चौधरी यांच्या शेतातील झाडास नायलॉन दोरीने सायंकाळी गळफास घेतल्याची फिर्याद भास्कर खंबाईत यांनी पेठ पोलिसांत दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.  

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी