देवळा (जि.नाशिक) : देवळा-वाखारी रोडवरील किराणा दुकानात चोरट्यांनी प्रवेश करत व चॉकलेट घेण्याचे निमित्त करत दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची पोत ओरबाडून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (ता. १५) घडली. या घटनेची देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दुकानदार महिलेची पोत ओरबाडली
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवळा-वाखारी रोडवर उज्ज्वल प्रोव्हिजन या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने आल्या. यातील एकाने दुकानात इतर कुणीच नाही याचा फायदा घेत झेप घेऊन दुकानदार वैशाली शेवाळकर यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून तेथून मित्राच्या दुचाकीवरून पसार झाला. दुकानात महिला एकटी असल्याचा फायदा या चोरट्याने घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत हरिश्चंद्र शेवाळकर यांनी देवळा पोलिसांना खबर दिली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ