येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री पदावर नव्यानेच शपथ घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे येवला शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने भुजबळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्याबरोबरच ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी क्रेनच्या साहाय्याने भुजबळांना हार घातला गेला.
नाशिकहून येवल्यात येताना रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. येवला शहरात प्रवेश करताना अंगणगाव येथे भुजबळ यांची उघड्या जीपमधून मिरवणूक निघाली. यावेळी भुजबळ यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच मतदारसंघात आले होते. शरद पवारांच्या जाहीर सभेत पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर असलेले अंबादास बनकर भुजबळांच्या स्वागत रॅलीत सहभागी असल्याने तालुक्यात चर्चेचे वातावरण होते. त्यात आत्ता ते भांडले पण ते दोघे पुन्हा एकत्र येतील, असे मत त्यांनी अजित पवार व शरद पवार यांच्या बाबतीत मांडले. या मिरवणुकीत भुजबळ आपले दोन्ही हात उंचावत ‘मी भुजबळ, माझे नाव भुजबळ’ असे माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घरातील पाेराबाळांचे हात धरा
शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे यांचा हात हातात घेत वर करीत उपस्थित जनतेला दाखवले होते. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी तुम्ही तुमच्या घरातील पोरा बाळांचे हातात हात घेतले असते तर कशाला हे झाले असते, त्यांनी अजित दादांचा हात धरून ठेवायचा ना. बाकीच्यांचे हात हातात धरून तुमच्या हातात काय राहणार, असा प्रश्न केला.
हेही वाचा :
- ‘आप’ला हवा काँग्रेसच्या मदतीचा ‘हात’
- नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती
- एका व्यक्तीच्या दोन जाती असू शकत नाहीत : हायकोर्ट
The post छगन भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत appeared first on पुढारी.