छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून इतर व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छगन भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्वाचे नेते आहे. तसेच अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे ओबीसी नेते असून ते बहुजन समाजाच्या न्यायहाक्कासाठी नेहमी लढा देत असतात. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांचा देशभर वावर असतो. सन २००२ ते २००३ या कालावधीत ते राज्याचे गृहमंत्री असताना विविध गँगच्या हस्तकांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. ओबीसी आरक्षण, मनुस्मृती जाळणे यासारख्या जिवंत प्रश्नांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. छगन भुजबळ हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील काम करतात याठिकाणी सुद्धा त्यांना धोका असतो. विविध संघटनांकडून छगन भुजबळ यांना मारण्याच्या धमक्या वेळोवेळी मिळत असतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या विरोधात नेहमी आंदोलने करतात.

छगन भुजबळ हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांची सुरक्षा पूर्वीप्रमाणे करण्यात यावी असे या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा :

The post छगन भुजबळ यांच्या सुरक्षितेत वाढ करा, युवक राष्ट्रवादीचे गृहमंत्र्यांना पत्र appeared first on पुढारी.