छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन

छगन भुजबळ

सिडको : पुढारी वृत्तसेवा; राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बाबत अंबादास खैरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हॉटसअप दवारे धमकी दिली आहे. तुम्ही निट रहा नाहीतर तुम्हाला बघुन घेऊ, अशी धमकी दिल्याची तक्रार आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धमकीच्या फोनचे कार्ड लोकेशन परभनीकडील दाखवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

हेही वाचा :

The post छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन appeared first on पुढारी.