छगन भुजबळ यांनी घेतली आ. सरोज अहिरे यांची भेट

छगन भुजबळ यांनी घेतली आमदार सरोज अहिरे यांची भेट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर नाशिक शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रविवारी (दि. 9) मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात अहिरे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, कैलास मुदलीयार, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संजीवनी रुग्णालयाचे डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. मधुर केळकर – कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज अहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत चर्चा केली. तसेच आवश्यकता असल्यास मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक तपासण्या करून आवश्यकतेनुसार मुंबईत उपचार घ्यावे, असेही त्यांनी सुचवले.

हेही वाचा : 

The post छगन भुजबळ यांनी घेतली आ. सरोज अहिरे यांची भेट appeared first on पुढारी.