छत्रपतींच्या सोन्याच्या सिंहासनासाठी सहकार्य करा – संभाजी भिडे गुरुजी

इंदिरानगर (नाशिक) : हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्याचे रक्षण करण्यासाठी आयुष्य कारणी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथे प्रस्तावित असलेल्या सोन्याच्या सिंहासनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी राजीवनगर येथे केले. 
येथील डे केअर सेंटर शाळेसमोरील मैदानावर झालेल्या धारकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भिडे गुरुजी म्हणाले, की रायगड येथे शिवाजी महाराजांचे सोन्याचे सिंहासन उभारून त्यावर ६५ किलो सोन्याची मूर्ती स्थापन करणार, अशी ४ जून २०१७ ला एक लाख १२ हजार धारकांनी शपथ घेतली आहे. ती शपथ पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी आता सहकार्य केले पाहिजे.

संभाजी भिडे गुरुजी - राजीवनगरमध्ये धारकऱ्यांची बैठक 

पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना मराठ्यांचा इतिहास शिकविला गेला पाहिजे. जिजाऊंचे आयुष्य खूप खडतर गेले. स्त्रियांचे सर्वांत मोठे दुःख असते ते कुंकू नसणे. जिजामातेचे कुंकू हरवले, तरी त्यांनी शिवाजी महाराजांना घडविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी वयात २८९ लढाया केल्या. माय-बहिणीचे कुंकू वाचविले. संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगले. त्यामुळे महाराजांचा जाज्वल्य इतिहास जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यासाठीच हे सिंहासन आवश्यक आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

तत्पूर्वी गुरुजींचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण केले. पांढरी टोपी घालून धारकरी उपस्थित होते. या वेळी नाशिक पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्‍याम बडोदे, सागर देशमुख, स्वप्नील वाघ, निकेत भोसले, रूपेश सावंत व धारकरी उपस्थित होते.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच