Site icon

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १० मार्च रोजी होत असून, या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे अध्यक्ष भूषण पगार व पदाधिकारी गावागावांत जाऊन ग्रामस्थांना निमंत्रण देत संवाद साधत आहेत.

पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, युवराज संभाजीराजे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तालुक्यातील कुंडाणे, ओतूर, शिरसमणी, भुसणी, दह्याणे, बिजोरे, विसापूर, भादवन, गांगवन, नवी बेज, जुनी बेज, देसराणे, अभोणा, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक सह इतर सर्व गावांमध्ये ग्रामस्थांशी भेट या सोहळ्याची पत्रिका नागरिकांना दिली जात आहे. या निमित्त नवी बेज येथे गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, घनश्याम पवार, ॲड. भाऊसाहेब पवार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, चंद्रकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कळवण शहरात उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होत असून, या सोहळ्याचे प्रत्येक निमंत्रण दिले जाणार आहे. हा सोहळा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

– प्रभाकर पाटील, ज्येष्ठ नेते, पाळे खुर्द

हेही वाचा :

The post छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण appeared first on पुढारी.

Exit mobile version