जणू त्या विहीरीत खुणावत होता ‘राहूल’चा काळ! क्षणार्धात होत्याचे नव्हते

सिन्नर (जि.नाशिक) :  विहिरीच्या कडेला उभे राहून राहून आतील खोदकाम बघत होता. पण अचानक नियतीचा फेरा आला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

जणू त्या विहीरीत होता 'राहूल'चा काळ
राहुल बाजीराव भगत (वय २८) असे तरुणाचे नाव असून, तो वावीजवळील फुलेनगर येथील रहिवासी होता. वावीत तो भावासोबत गॅरेज व्यवसाय चालवत होता. काही महिन्यांपूर्वी भगत कुटुंबाने वावी शिवारात शेतजमीन विकत घेतली होती. त्या जमिनीत नव्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास दुकानावर गर्दी नसल्याने विहिरीचे काम बघून येतो, असे सांगून तो शेताकडे गेला. कामावरील मजुरांची जेवणासाठी सुटी झाली होती. ते बाजूला असलेल्या झाडाजवळ जेवण करत होते. विहिरीच्या कडेला उभे राहून आतील खोदकाम बघत असताना राहुलचा अचानक तोल गेला व तो विहिरीत कोसळला.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

डॉक्टरांकडून मृत घोषित

कामगारांनी धाव घेत यारीच्या सहाय्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले. सिन्नर येथे खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना पाहणी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१६) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार