जनतेचा विश्‍वास तुम्ही सर्व सार्थ ठरवाल – दादा भुसे

मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेवर विश्‍वास दाखविला. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. नवनिर्वाचित सदस्यांना ग्रामविकासासाठी मोठी संधी आहे. संधीचे सोने करा. आपापल्या गावच्या विकासाचे दूत बनून लोकसेवेसाठी कार्यरत राहा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता.२१) येथे केले. 

जनतेचा विश्‍वास तुम्ही सर्व सार्थ ठरवाल...

तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयातील सत्कार समारंभात ते बोलत होते. विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करु. जनतेचा विश्‍वास तुम्ही सर्व सार्थ ठरवाल, अशी खात्री आहे असे ते म्हणाले. भुसे यांच्या हस्ते भगवी शाल घालून सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, पदाधिकारी, गट-गण प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा