जन्मदाताच बनला काळ! मुलाच्या छातीवर बसून आवळला गळा; परिसरात खळबळ

नाशिक : आठवड्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे. नांदूर नाका येथे तीनच दिवसांपूर्वी अनैतिक संबंधात अडसर ठरतो, म्हणून मातेने आणि तिच्या प्रियकराने सातवर्षीय मुलाचा खून केला होता. यानंतर काही दिवसातच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

जन्मदाताच बनला काळ! 

नीलेश दोन बहिणी, आई जयश्री व वडील प्रभाकर माळवाड यांच्यासोबत जनरल अरुणकुमार वैद्यनगरमधील भक्ती-सिद्धांत सोसायटीत राहत होता. प्रभाकर माळवाड यांच्या विवाहबाह्य संबंधावरून वडील व मुलात कायमच वाद व्हायचे. त्यात प्रभाकर ‘मुलाला खून करून टाकेन’ अशी कायमच धमकी द्यायचा. वर्षापूर्वी संशयित प्रभाकर यांनी त्यांची दीड एकर शेती त्यांच्या कल्पना या दुसऱ्या महिलेच्या नावावर केल्यापासून वडील व मुलातील वाद विकोपाला गेले होते. रविवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास जेवताना बापलेकात पुन्हा वाद झाला. नीलेशने शेतात पोल्ट्री फार्म टाकून द्या, अशी मागणी केल्याने संतापलेल्या प्रभाकरने मुलगा नीलेशला मारहाण केली व त्याच्या छातीवर बसून गळा आवळून ठार मारल्याची तक्रार मुलाची आई व प्रभाकर यांच्या पत्नी जयश्री माळवाड यांनी दिली आहे. त्यावरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

बापाला अटक

आडगाव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरतो, म्हणून मुलाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना, मुंबई नाका शिवारात आणखी एका बापाने मुलाचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. ४) उघडकीस आली. नीलेश प्रभाकर माळवाड असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत निवृत्त महिला पोलिस जयश्री माळवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रभाकर माळवाडविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

बापच बनला काळ 
आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. नांदूर नाका येथे तीनच दिवसांपूर्वी अनैतिक संबंधात अडसर ठरतो, म्हणून सातवर्षीय मुलाचा खून केला होता. विवाहबाह्य संबंधामुळे पोटच्या मुलाच्या खुनाचा दुसरा प्रकार सोमवारी उघडकीस आला.