जमावबंदीच्या गुन्ह्यांतून आमदारांनी काढले अंग; पोलिस ठाण्यांच्या चकरांनी  कार्यकर्त्यांची दमछाक  

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीला घेरण्यासाठी भाजपने मंदिर उघडण्यासाठी लॉकडाउन काळात आंदोलन केल्यानंतर आमदारांसह कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जमावबंदीचे गुन्हे दाखल केले; परंतु आमदारांनी गुन्ह्यातून अलगद नाव काढून घेत कार्यकर्त्यांना तसेच वाऱ्यावर सोडल्याने पोलिस ठाण्यांच्या चकरा मारून कार्यकर्त्यांची दमछाक झाली आहे. 

अनेक दिवसांच्या या शिरस्त्यामुळे कार्यकर्ते वैतागले
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर केला. तीन महिने संपूर्ण व्यवस्थाच बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले. राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू करताना एक-एक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. सणासुदीच्या काळात मंदिरे बंद असल्याने भाजपकडून राजकीय लाभ उचलण्यासाठी हा मुद्दा दिवाळीत हाती घेतला. राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी घंटा वाजविण्याचे आंदोलन केले. नाशिक शहरातही शहराच्या चारही विधानसभा मतदारसंघांत आंदोलन झाले. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही आंदोलन झाले. त्यामुळे जमावबंदीचा आदेश मोडल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल झाल्याने कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक दिवसांच्या या शिरस्त्यामुळे कार्यकर्ते वैतागले आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

कार्यकर्त्यांकडून नाराजी 
गुन्ह्यातून आमदारांनी अंग काढून घेतले आहे. कार्यकर्ते मात्र गुन्हे दाखल असल्याने त्यांना पोलिस ठाण्यांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. आमदारांचा गुन्ह्यात समावेश असता तर कार्यकर्त्यांमध्ये हुरूप असता, परंतु आमदारांनी स्वतःचे नाव काढून कार्यकर्त्यांचे नाव तसेच ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ