जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण

देवळा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील महालपाटणे येथे आज शनिवार (दि. २८) रोजी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यात गावातील सर्वच सकल मराठा समाज बांधवानी सहभाग घेतला आहे. तसेच

या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारचे उपोषणे तसेच आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील महाल पाटणे गावात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

साखळी उपोषणात योगेश अहिरे, सुनील अहिरे, नाना अहिरे, शंकरराव झाल्टे, शरद ठाकरे, विनोद ठाकरे, दादाजी पवार, नितीन अहिरे , घनःश्याम शेवाळे, अशोक अहिरे, शामकांत ठाकरे, भावेश खरोले, भाऊसाहेब अहिरे, मधुकर जाधव, राकेश अहिरे, कैलास पवार, राहुल अहिरे, मंगेश कुलकर्णी, प्रवीण आवारे, मछिंद्र ठाकरे आदी गावातील सकल मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते . विविध घोषणा देत आरक्षणाची मागणी केली.

हेही वाचा :

The post जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण appeared first on पुढारी.