जळगांव ; पुढारी वृत्तसेवा एरंडोल शहरांमध्ये नगरपालिकेच्या एका बांधकामावर ठिकाणी मुले खेळत असताना नऊ वर्षीय मुलाच्या छातीत आसारी (सळई) घुसून त्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये नगरपालिकेचे अभियंता व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही सळ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. या नगरपालिकेच्या बांधकामाच्या ठिकाणी मूले खेळत होती. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा. हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) हा (९ वर्षीय) बालक खेळत असताना त्याच्या छातीत सळी घुसून त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना काल (सोमवार) संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
भिल्ल समाजाच्या संघटनेच्या वतीने जोशींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. शेवटी विशाल याचे वडील रवी बिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या बांधकामावर देखरेख करणारे अभियंता व ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मृत मुलगा आई, वडील, लहान भाऊ-बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. ही घटना ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे झाली आहे. दोषींवर नगरपालिकेने कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी केली.
हेही वाचा :
- Uttarakhand Tunnel Crash News | बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी ९०० मिमी पाइपचा वापर, तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी
- Israel-Hamas war : युद्धाच्या ३९ व्या दिवशी इस्रायलचा हमासच्या ‘संसदे’वर कब्जा, IDF ने झेंडा फडकवला
- Israel-Hamas War : १६ वर्षांनंतर हमासने गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
The post जळगांव : बालकाचा छातीत सळी घुसून मृत्यू ! appeared first on पुढारी.