जळगावमध्ये भाजपने प्रथमच जिल्हाध्यक्षपदी निवडले तीन शिलेदार

जळगाव,www.pudhari,news
जळगाव : भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात प्रथमच तीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रावेर ग्रामीण अध्यक्षपदी अमोल हरिभाऊ जावळे, तर जळगाव शहर अध्यक्षपदी नगरसेविका उज्वला किरण बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ज
भाजप तर्फे जिल्ह्यात यापूर्वी जळगाव ग्रामीण व जळगाव शहर असे दोन अध्यक्ष दिले होते. यात बदल करत आता तीन अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. जळगाव ग्रामीणसाठी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर ग्रामीणचे अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष, माजी खासदार (कै) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आहेत. तर जळगाव शहर अध्यक्ष उज्वला किरण बेंडाळे या भाजपच्या महापालिकेत नगरसेविका आहेत. शहराध्यक्षपदी पक्षाने प्रथमच महिलेला संधी दिली आहे.

हेही वाचा

 

The post जळगावमध्ये भाजपने प्रथमच जिल्हाध्यक्षपदी निवडले तीन शिलेदार appeared first on पुढारी.