जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) कापसाचा पेरा झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.
पहिल्या जोरदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, नंतरच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट उभे होते. जुलैत मात्र चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे. खरिपाचे एकूण क्षेत्र यंदा ७ लाख ७० हजार ८७४ हेक्टर होते. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ११ हजार ५०९ हेक्टवर (७९ टक्के) पेरण्या झाल्या आहे. कपाशीचा विचार करता कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९८ हजार ९२५ हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. त्यातील कोरडवाहू पेरण्या २ लाख ७४ हजार ५८४ हेक्टरवर तर बागायती पेरण्या २ लाख १९ हजार ४४ हेक्टरवर झाल्या आहेत.
तालुकानिहाय पेरण्या …
जळगाव तालुक्यात ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर भुसावळ- ६१ टक्के, बोदवड- ९२ टक्के, यावल – ६७ टक्के, रावेर- ७१ टक्के, मुक्ताईनगर- ७७ टक्के, अमळनेर- ८५ टक्के, चोपडा- ७२ टक्के, एरंडोल- ८८ टक्के, धरणगाव- ७८ टक्के, पारोळा- ९९ टक्के, चाळीसगाव- ६९टक्के, जामनेर- ९४ टक्के, पाचोरा – ७२ टक्के, भडगाव- ८१ टक्के पेरण्या झाल्या
हेही वाचा :
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; १३ एनआरडीएफ आणि २ एसडीएफच्या टीम तयार
- Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने
- गोवा : कामत, लोबो यांच्या अपात्रतेबाबत अधिवेशनानंतर विचार : रमेश तवडकर
The post जळगावमध्ये शेतकऱ्यांचा पेरण्या उरकण्यावर भर ; खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या appeared first on पुढारी.