जळगावातील दोघांची ऑनलाईन फसवणूक; ॲप डाऊनलोड करताच बसला झटका

फसवणूक

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढल्‍या आहेत. यामुळेच ऑनलाइन पेमेंट करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकणी सायबर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६२, रा.गजानन कॉलनी ) यांनी याबात तक्रार दाखल केली. दि. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी मोबाईल धारकाने टेक्स्ट मेसेज करुन ‘क्विक सपोर्ट ॲप’ डाउनलोड करण्याची लिंक पाठवली. यावरुन ॲप डाउनलोड करताच अमरेलीवाला यांच्या इंन्डसइन या बँकेतील एकूण २० हजार रुपये कमी झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ओटीपी मागून ५० हजारांचा गंडा… 

दरम्‍यान, अश्विनी जयेश सावकारे (वय ३५, रा. वाघ, जळगाव ) यांना १५ नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञात महिलेनं फोन करत तुमच्या एक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी प्राप्त करुन घेतला. यानंतर सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेचच जळगाव सायबर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

हेही वाचा 

ऊस वाहतूकदार आणि ट्रॅक्टर चालकांना खास वॉर्निंग ! काष्टीतील हटके बॅनरची सर्वत्र चर्चा 

लातूर : किल्लारी परिसराला भूकंपाचा धक्का, २९ वर्षापूर्वीच्या आठवणी झाल्या जाग्या 

Jeff Bezos | टीव्ही, कार, फ्रीज खरेदी करु नका, आर्थिक मंदी येतेय, अब्जाधीश जेफ बेझोस यांचा सल्ला 

The post जळगावातील दोघांची ऑनलाईन फसवणूक; ॲप डाऊनलोड करताच बसला झटका appeared first on पुढारी.