जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव निवेदन,www.pudhari.news

जळगाव : जळगाव महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध निकृष्ठ कामांच्या तक्रारींसह रेशनकार्डच्या १२ आकडी नंबरसाठी पैशांची देवाणघेवाण होत असून याची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिकेच्या वतीने शिवाजी नगरात विविध विकास कामे सुरू आहे. यात खड्डे बुजणे, गटारीवर ढापे टाकणे, रोड तयार करणे अशी कामे सुरू आहे. परंतू सुरू असलेली कामे ही अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचे होत आहे. बांधकाम अभियंता सोनगिरे हे सर्वांना पाठीशी घालण्याचे काम करत असून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण असल्याचे संशय नागरीकांकडून केला जात आहे. या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच जळगाव शहरात स्वस्त धान्य दुकानदार व अधिकारी हे संगनमताने नवीन कार्ड तयार करणे आणि १२ आकडी नंबर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात आहे. याची देखील चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लांडवंजारी, उपाध्यक्ष अमोल कोल्हे, भगवान सोनवणे, इब्राहिम तडवी, संजय जाधव, किरण राजपूत, सुनिल माळी, शुभम चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

The post जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.