Site icon

जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन

जळगाव : वनविभागातर्फे जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रानससे, नीलगाई, लोधडी, चितळ, रानगवा, माकडे, हरीण, चिंकारा आदी प्राणी आढळून आली आहेत.

मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प व यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असलेल्या भागात मचाणी उभारून रात्रभर चंद्राच्या उजेडात प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. यावेळी मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात चक्क पट्टेदार वाघाचे तर यावल अभयारण्यात बिबट्याचे दर्शन झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वनरक्षक यांनी काम केले.

हेमराज पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील, (रावेर), डॉ. अविनाश गवळी (भुसावळ), पराग चौधरी, मनीष चव्हाण (पाल), कल्पेश खत्री (फैजपूर), लंगडा आंबा वनपाल समाधान करंज, वनरक्षक अब्दुल तडवी, जामन्या वनपाल पाटील, वनरक्षक अजय चौधरी, वन्यजीवचे वनपाल संभाजी सूर्यवंशी यांनी गणनेत सहभाग घेतला.

वायला, कोयला, भट्टी, बारी, भाटी, धरण, भाऊ कुटी, बंधारा लोखंडी मचान या ठिकाणी मचाणी उभारून हि गणना करण्यात आली. चिंकारा ९, वानर ११, लांडगा ८, भेकर १, नीलगाय १, बट १, ससा ६, मोर १५, कोल्हा १२, रान मांजर ७, तरस ७, रानडुक्कर ७, उदमांजर २, हरीण १५ आढळून आले. तर रान डुक्कर ४, कोल्हे ५, अस्वल १, मोर ३, रान ससे २, जामन्या वनपरिक्षेत्रात हरीण ६, अस्वल १, मोर ५, माकड १०, कोल्हे २ आढळले.

हेही वाचा :

The post जळगावातील वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे दर्शन appeared first on पुढारी.

Exit mobile version