Site icon

जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगावातील २९ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. २९ वर्षीय पीइता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून, ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडितेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान याने फोनवरून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पीडितेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला. तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार appeared first on पुढारी.

Exit mobile version