जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार

मृत माकडावर अंत्यसंस्कार,www.pudhari.news

जळगाव : जळगावातील मुक्ताईनगरात आज भूतदयेचा प्रत्यय आला. मुक्ताईनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांकडून विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यामुळे तालुक्यात हा एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला.

शहरातील कुंभारवाडा परिसरात राहणारे पारस जैन व कोमल राजपूत यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने एक माकड मृत अवस्थेत आढळून आले. ही बाब शितल जैन यांनी वंदे मातरम ग्रुपचे धनंजय सापधरे यांना कळवले. त्यानंतर तात्काळ शुभम तळले, वैभव तळले, मधुकर सुरंगे, अजय भंगाळे, श्रीकांत दहिभाते, सोपान मराठे, गौरव कोळी, राजेंद्र वानखेडे, समाधान कुंभार या तरुणांनी एकत्रित जमून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा अर्बन व ओम साई सेवा फाऊंडेशनच्या स्वर्ग रथातून माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे विधिवत अंतिम संस्कार करून माणुसकी जपण्यात आली.

हेही वाचा :

The post जळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.