जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार

इमारत कोसळून महिला ठार,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरात एक जुनी इमारत आज सकाळी नऊच्या सुमारास अचानक कोसळून चार जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले तर वृद्ध महिला मरण पावली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील एक इमारत सकाळी कोसळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिका प्रशासनाने तत्काळ जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटविण्यास प्रारंभ केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व महापौर जयश्री महाजन यांनीदेखील तेथे धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना तत्काळ बाहेर काढण्यात यश आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७५ वर्षीय राजश्री सुरेश पाठक यांना बाहेर काढण्यात येऊन त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

हेही वाचा :

The post जळगावात जीर्ण इमारत कोसळून महिला ठार appeared first on पुढारी.