
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अजिंठा चौक परिसरातील इदगाह व्यापारी संकुलाला लागून असलेल्या भंगार बाजारातील टायर गोदामाला आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. टायरमुळे आगीने रौद्र रुप धारण केले होते. टायर गोदामासह शेजारीच असलेल्या प्लायवूड व बाटल्यांच्या गोदामाला देखील याची झळ बसली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हबीब खान मोहब्बत खान यांच्या मालकीचे गोदाम असून त्यात जुने व भंगार टायर साठविण्यात आलेले होते. त्यांच्याच शेजारी शेख मेहमूद यांच्या मालकीचे जुन्या बाटल्यांचे गोदाम आहे. दुसऱ्या बाजुला प्लायवूडची खोली आहे. या आगीत तिघं दुकानातील वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे पाच बंब यावेळी मागविण्यात आले होते.
या भागात रहिवास नसल्याने मोठा धोका टळला. दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारी लोकांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश गोसावी, गोविंदा पाटील व मुदस्सर काझी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी मनपा अग्निशमन दलाला पाचारण केले होते.
हेही वाचा :
- पिंपरी : खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई
- मुंबई क्राईम ब्रँच पथक कोल्हापुरात, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी
- Case against ShivSena: मोदींसह अन्य नेत्यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांविरुद्ध गुन्हा
The post जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.