Site icon

जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात नाकाबंदी करताना दोन तरुण संशयितरित्या दुचाकीवरुन जाताना आढळले. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली असता, एकाजवळ तलवार आढळून आल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. यातील एक जण हा हद्दपार आरोपी असल्याचे उघड झाले आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.20) सायंकाळी नाकाबंदी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास सिंधीकॉलनी, कंवरनगर पोलीस चौकीसमोर रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दुचाकीवरील संशयित जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (२६, रा. बिलालचौक, तांबापूरा, जळगाव), रहिम शेख सलीम (२८, रा. मास्टरकॉलनी, जळगाव) आढळले. संशयिताच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली आहे. तर, जुनेद शेख हा एक वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात आल्याने त्याच्याविरोधात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार संदीप सपकाळे, अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, ललित नारखेडे, रवींद्र पाटील यांच्या पथकाने केली.

हेही वाचा:

The post जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version