जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक

पिस्तुल
जळगाव : विनापरवाना गावठी पिस्टल घेवून दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. संशयीताकडून २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले. हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परीसरात ही कारवाई करण्यात आली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण विनोद शिंदे (वय २१, धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
जळगावातील हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परीसरात एक तरूण विनापरवाना गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाळे, संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र तावडे, सागर देवरे, महिला पोलीस कर्मचारी स्वाती बागे, रवींद्र चौधरी यांनी शनिवार, २ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई करत संशयीत आरोपी प्रवीण विनोद शिंदे (वय २1, रा. धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व जीवंत काडतूस हस्तगत जप्त करण्यात आले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी प्रवीण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

The post जळगावात पिस्तुलाच्या धाकाने दहशत पसरविणा-यास अटक appeared first on पुढारी.