जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर भाऊ गंभीर

अपघात

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली आहे. ही दुर्घटना आज (दि. १५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. यात तरुणीचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक ( एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनीकडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२० रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५, रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे.

पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील तरुणीचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून, याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा:

The post जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर भाऊ गंभीर appeared first on पुढारी.