जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन

जळगाव राहुल गांधीविरोधात आंदोलन,www.pudhari.news

जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. या निषेधार्थ भाजप युवामोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय. या आंदोलनात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी घोषणा करत त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भा.ज.यु.मो महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, नगरसेवक राजू मराठे, जितेंद्र मराठे, दिपमाला काळे, सुचिता काळे, गायत्री राणे, किशोर चौधरी, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, स्वामी पोतदार, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैनदाने, मयूर भोई , रोहित सोनवणे , जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, दीप्ती चिरमाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.