
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरात वाहनांना आग लावण्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक वाहने पेटवत असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. येथील गणपतीनगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीतील दोन चारचाकी वाहनांसह दुचाकीलाही पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या गणपतीनगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीतील मिलन सलामतराय तलरेजा (३०) यांची चारचाकी (एम.एच.१९, डी.व्ही. ४१९३) ला शुक्रवारी (दि.28) पहाटे साडेतीन वाजता अज्ञाताने कपड्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. शेजार्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर तलरेजा यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीमध्ये चारचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीच चारचाकी विकत घेतली होती. शिवाय याच गल्लीतील श्रीचंद घनश्यामदास अडवाणी (४७) यांची चारचाकी (एम.एच.१९, सी.झेड.२२७७) व इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एम.एच.१९ डी.झेड.७२४४) देखील अशाच पद्धत्तीने पेटवून देण्यात आली. या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- Babar Azam : पाकिस्तानात संघात बंडखोरी, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर संकट
- GM Mustard : ‘जीएम मोहरी’च्या लागवडीला परवानगी देऊ नये; स्वदेशी जागरण मंचची केंद्र सरकारकडे मागणी
- इचलकरंजी : मध्य प्रदेशातील प्रेयसीला बसस्थानकात सोडून प्रेमवीराची धूम
The post जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली appeared first on पुढारी.